अभिषेकने केली अवॉर्ड्‍सची हैटट्रिक

अभिनेता अभिषेक बच्चनला ‘बोल बच्चन’ या सिनेमातील कॉमिक रोलसाठी बिग स्टार एंटरटेनमेंट अवॉर्ड मिळाला आहे. देशामधील या महत्वाच्या समजल्या जाना-या व्युवर्स चॉइस अवॉर्ड्‍सने नुकतेच त्याला सन्मानित करण्यात आले. अभिषेकने १९ व्या वार्षिक स्क्रीन अवॉर्ड्‍समध्ये बेस्ट एक्टर इन ए कॉमिक रोलचा अवॉर्ड सुद्धा मिळवला आहे. हा अवॉर्ड मिळवताना त्याने कॉमिक रोलच्या अवॉर्ड्‍सची हैटट्रिक पूर्ण केली आहे.

याबाबत अभिषेकने त्याच्या ट्‍विटरवर ‘बोल बच्चन’ या सिनेमाच्या टीममुळे ‘बेस्ट कॉमेडी एक्टर’ चा अवॉर्ड मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. हा मिळालेला अवॉर्ड या सिनेमाच्या संपूर्ण टीम सोबत शेयर करणार असून विशेष म्हणजे अभिनेता अजय देवगन आणि दिग्दर्शक रोहित यांच्या मार्गदर्शनामुळे हा अवॉर्ड मिळाला असल्याचे स्पष्ट केले. अभिषेकने यावेळी सर्वच प्रेक्षकाचे देखील आभार मानले आहेत.

रोहित, अजय देवगन, प्राची देसाई आणि असीन यांच्या सोबतच ‘बोल बच्चन’ या सिनेमाच्या टीमने खुप मेहनत घेतली आहे. त्यामुळेच हा सिनेमा हिट झाला आहे. तसे पहिले तर प्रत्येक रोल हा एवढा महत्वपूर्ण नाही. या रोलला एवढे महत्व दिल्यामुळे मी खुश आहे. येत्या काळात मी आपल्या अभिनयच्या मध्यामातून प्रेक्षकाचे मनोरंजन करणार असल्याचे अभिषेकने स्पष्ट केले.

Leave a Comment