‘बर्फी’ सिनेमाला सर्वाधिक नॉमिनेशन

फिल्मकार अनुराग बसु यांच्या ‘बर्फी’ या सिनेमाला आयडिया फिल्म फेयर अवार्ड्स-२०१२ मध्ये सर्वाधिक नॉमिनेशन मिळाले आहेत. ‘बर्फी’ या सिनेमाला सर्वश्रेष्ठ फिल्म सोबतच सर्वश्रेष्ठ अभिनेता, सर्वश्रेष्ठ अभिनेत्री आणि सर्वश्रेष्ठ दिगदशक म्हणून सर्वाधिक नॉमिनेशन मिळाले आहेत. त्याशिवाय दिवंगत निर्माता यश चोप्रा यांच्या ‘जब तक है जान’ या सिनेमाला सर्वाधिक नॉमिनेशन मिळाले आहेत.

मुका आणि बहिरा असेलेला मुलगा (रणबीर कपूर) आणि ऑटिस्टिक युवती (प्रियंका चोप्रा) या दोघाच्या प्रेम कहानीवर आधारित ‘बर्फी’ या सिनेमाला सर्वाधिक नऊ नॉमिनेशन मिळाले आहेत. शाहरुख खान अभिनीत ‘जब तक है जान’ या सिनेमाला सर्वाधिक सात नॉमिनेशन मिळाले आहेत. सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून रणबीर ‘बर्फी’ आणि शाहरुख ‘जब तक है जान’ ऋतिक रोशन (‘अग्निपथ’), इरफान खान (‘पान सिंह तोमर’), मनोज बाजपेयी (‘गैंग्स ऑफ वासेपुर’) आणि सलमान खान (‘दबंग-२’) यांच्या नावाचा सहभाग असणार आहे.

सर्वश्रेष्ठ हिरोइनमध्ये प्रियंका चोप्रा (‘बर्फी’), दीपिका पादुकोण (‘कॉकटेल’), करीना कपूर (‘हीरोइन’), परीणिति चोप्रा (‘इशकजादे’), श्रीदेवी (‘इंगिलश विंग्लिश’) आणि विद्या बालन (‘कहानी’) यांच्या नावांचा समावेश आहे. सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकमध्ये अनुराग बसु (‘बर्फी’), अनुराग कश्यप (‘गैंग्स ऑफ वासेपुर’), गौरी शिंदे (‘इंग्लिश विंग्लिश’), सुजीत सरकार (‘विक्की डोनर’) आणि सुजॉय घोष (‘कहानी’) याच्या नावाचा समावेश आहे. फिल्म फेयर पुरस्काराच्या नॉमिनेशनची घोषणावेळी अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, श्रीदेवी, आलिया भट्ट, हुमा कुरैशी, इमरान खान आणि रणवीर सिंह उपस्थित होते.

Leave a Comment