प्रियंका सोबत बीजी आहे इमरान

सध्या अभिनेता इमरान खान त्याच्या को-स्टारची सदैव तारीफ करीत असतो. काही दिवसापूर्वी तो ‘मटरू की बिजली का मन्डोला’ या सिनेमाचे प्रमोशन करीत असताना तो नेहमीच अभिनेत्री अनुष्का शर्माची तारीफ करीत होता. तर आता त्याने अनुष्काला सोडून गेल्या काही दिवसापासून सोनाक्षी सिन्हा आणि प्रियंका चोप्राची तारीफ करण्यास त्याने सुरुवात केली आहे.

आगामी काळात इमरान खानचे ‘मिलन टॉकीज़’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई -२’ हे दोन सिनेमे रिलीज होणार आहेत. या सिनेमात इमरानच्या ऑपज़िट सोनाक्षी सिन्हा आणि ‘मिलन टॉकीज’ या सिनेमात अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोबत दिसणार आहे. त्यामुळेच तो या सिनेमातील को-स्टारला खुश करण्याच्या कामात बिजी आहे. तसे पहिले तर इमरान खानला ज्यावेळी कामातून थोडीसी सवड मिळते त्यावेळी को-स्टारसोबत चांगली ट्यूनिंग बनविण्याचा प्रयत्न तो करीत असतो. एवडेच नव्हे तर इमरानजवळ लेटेस्ट टेक्नॉलजीचा कैमरा आहे. तो कैमरा शूटिंग करीत असताना तो सोबत घेऊन येतो. शुटच्या कामातून फ्री झाल्यानंतर तो इकडचे तिकडे पिक्चर्स काढण्यात व्यस्त असतो.

काही दिवसापूर्वी झालेल्या एका पार्टीत इमरान आणि प्रियंका सोबत फिरताना दिसले. याबाबत बोलताना इमरान म्हणाला, ‘ सध्या प्रमोशनचा काळ आहे. त्यामुळे सर्वचजण सिनेमा प्रमोट करण्याच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे मी हिरोइनची तारीफ करून सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असतो.’

Leave a Comment