गर्ल्स बघितल्यानंतर बदलतोय रणवीर

तसे पहिले तर काहीसा लाजाळू असलेला अभिनेता रणवीर सिंह याला सिनेमात काम करताना सर्वानीच पाहिले असेल. मात्र तसे पहिले तर रणवीर शो ऑफ करण्याच्या कामात कमी नाही. सिनेमाचे शूट सुरु असताना गर्ल्सला बघितल्यानंतर रणवीरचा ऐटिट्यूडमध्ये मात्र बदल होतो याची कल्पना त्याच्या सहकार्यांना आली आहे.

काही जणांना वाटत असेल की रणवीरची आम्ही उणे धुणे काढत आहोत. मात्र ही बातमी खरी आहे. या वृत्ताला काही गर्ल्सनीच दुजोरा दिला असून त्यांना बघितल्यानंतर रणवीरचे ऐटिट्यूड बदलल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.

अभिनेता रणवीर एका क्लबमध्ये नियमित जात असतो. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या युवतींना रणवीरचे वागणे थोडेसे हैराण करणारे वाटले. विशेषता काही युवतीना पाहिल्यानंतर त्याचे वागणे एकदम बदलते. काही वेळा तो उत्साहात शो ऑफ देखील करीत असतो. एवढेच नव्हे तर तो स्विमिंग करीत असताना देखील वेगळ्याच मूड मध्ये तो असतो. ज्या पद्धतीने तो वागत असतो त्यावेळी तो एक सिने अभिनेता आहे असे देखील वाटत नाही. त्याच्या या वागण्यामुळे मात्र काही काळ तर सर्वाना आश्चर्य वाटते.

Leave a Comment