गंभीर रोल आवडतो- रणबीर कपूर

इंडस्ट्रीजमध्ये कोणाला कशा प्रकारचा अभिनय करायला आवडतो हे सांगणे तसे पहिले तर कठीण आहे. आता चॉकलेट बॉय असलेल्या अभिनेता रणबीर कपूरचेच उदहरण घ्या ना त्याला सिनेमात गंभीर रोल करायला आवडतो. गंभीर भूमिका केल्याने त्याला शूटिंगनंतर कित्येकवेळा तो तशाच मूडमध्ये असतो. त्यामुळे त्याच्या कामांवर या सर्व गोष्टीचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे त्याने सांगितले.

अभिनेता रणबीरने यापूर्वी ‘रॉकस्टार’ आणि ‘बर्फी’ या सिनेमात गंभीर रोल केला आहे. याबाबत बोलताना रणबीर म्हणाला, ” सिनेमात गंभीर रोल केल्याने आपण कित्येकवेळा त्याचा मूड चांगला असतो. त्यामुळे कामांवर या सर्व गोष्टीचा आपल्या चरित्रवर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे काही वेळ तर उत्साहात जातो. त्यामुळेच मला गंभीर स्वरूपाचा रोल करायला आवडतो. कधी कधी हे काम करणे नुकसानदायी सुद्धा ठरते. ‘रॉकस्टार’ या सिनेमात काम केल्यानंतर काही दिवस मला नैराश्य आले होते. मात्र काही दिवसानंतर मात्र बरे वाटायला लागले. ‘

‘बर्फी’ या सिनेमात रणबीर मूक-बधिरची भूमिका केली होती तर ‘रॉकस्टार’ या सिनेमात त्याने गायकाची भूमिका केली होती. ‘ रॉकस्टार’ या सिनेमातील अभिनयासाठी रणबीरला फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. यावर्षी रणबीरचे दोन सिनेमे रिलीज होत आहेत. अभिनव कश्यपचा ‘बेशरम’ या सिनेमात त्याच्या सोबत त्याचे आई आणि वडील काम करीत आहेत. तर ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमात त्याच्या सोबत दीपिका पादुकोण झळकणार आहे.

Leave a Comment