आराध्याची नाही माझी आहे कार- बीग बी

गेल्या काही दिवसापासून बीग बी अमिताभ बच्चन यांनी त्याच्या फैन्सची झालेली चूक दूर केली आहे. अभिषेकने आराध्याला तिच्या फर्स्ट बर्थडेसाठी एक कार गिफ्ट दिली होती. तसे पहिले तर ती कार आराध्याची बर्थडे गिफ्ट नव्हती, तर ती कार काही जणांनी अमिताभला गिफ्ट दिली होती.

गेल्या काही दिवसपासून अमिताभ बच्चन त्यांच्या बाबतीत सोशल साइट्सवर येत असलेल्या चुकीच्या बातम्यामुळे परेशान आहे. त्यांनी या बाबतीत फेसबुकवर झालेल्या चुकीचा खुलासा केला असून फैन्सची झालेली चूक दूर केली आहे. बिग बी म्हणाले, ‘ माझ्या बाबतीत सर्वच सोशल नेटर्वर्क्सवर चुकीच्या अफवा पसरविण्यात आल्या आहेत. आराध्याच्या बर्थडे दिवशी एक अफवा पसरली होती की, अभिषेकने आराध्याला तिच्या फर्स्ट बर्थडेसाठी कार गिफ्ट केली आहे.’

मात्र बिग बी म्हणाले, ‘ सत्य असे आहे की आराध्याला कोणीच कार गिफ्ट केली नाही. काही जणांनी माझ्या बर्थडेसाठी कार गिफ्ट केली आहे. त्यांनी त्यासाठी एक मिनी कूपर कार खरेदी केली होती. मला २८८२ नंबर प्लेट वाली कार खूप पसंद आहे. २८८२ माझ्या लाइफमधील खास डेट आहे. ही तारीख माझ्यासाठी सेकंड बर्थडे आहे. कुली सिनेमाच्यावेळी ऐक्सिडेंटनंतर माझा दूसरा जन्म २ अगस्त १९८२ ला झाला होता. त्यामुळे २८८२ या तारखेत २ तारीख ८ महीना आणि ८२ साल हे सगळेच येत असल्याने मला हा नंबर आवडतो.

Leave a Comment