अर्जुनच्या अभिनयाचे केले पत्नीने कौतुक

गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेला ‘इंकार’ हा सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होत आहे. हा २१०३ सालामधील पहिला शुक्रवार असणार आहे की त्यादिवशी मोठ्या प्रमाणात सिनेमे रिलीज होत आहेत. या शुक्रवारी रिलीज होणा-या सर्वात मोठ्या सिनेमात ‘इंकार’ या सिनेमाचा समावेश आहे. यामधील अर्जुन रामपाल याच्या अभिनयाचे त्याची पत्नी मेहर जेसिया हिने कौतुक केले आहे.

अर्जुन रामपाल याच्या ‘इंकार’ मधील अभिनयाची त्याची पत्नी मेहर जेसिया हिने कौतुक केले आहे. सिनेमाच्या विशेष शो नंतर मेहरने अर्जुनच्या अभिनयाचे मनापासून कौतुक केले आहे. मॉडल आणि पूर्व मिस इंडिया मेहर म्हणाली, ‘ अर्जुनच्या कामावर मला गर्व आहे. मला हा सिनेमा मनापासून आवडला आहे. हा सिनेमा थोडासा हटके असल्याने सर्वांनाच आवडेल असा आहे. दिगदर्शक सुधीर मिश्राने खूपच वेगळ्या स्वरूपाच्या सिनेमाची निर्मिती केला आहे. सिनेमाचा विषय जरी खूपच बोल्ड असला तरी त्यांनी महिलेवरील अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम केले आहे.’

सुधीर मिश्रा दिग्दर्शन करीत असलेल्या या सिनामात अर्जुन रामपालसोबत चित्रगंदा सिंहची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा भारतामधील कुठल्याही ऑफिसमध्ये महिलासोबत पुरुष साथीदाराकडून केल्या जाण-या व्यवहारावर केंद्रित आहे. हा सिनेमा प्रामुख्याने फ्लर्टिंग आणि शोषण याच्यावर आधारित आहे.या सिनेमात अभिनेत्री चित्रांगदाने खूपच हॉट सीन्स दिले आहेत. सिनेमाचा हा विषय पाहिल्यानंतर प्रत्येकाला त्याच्या ऑफिसची आठवण येणार आहे. ‘यह साली जिंदगी’ या सिनेमानंतर सुधीर मिश्राचा हा सिनेमा आहे. या सिनेमाचे सिंगर्स स्वानंद किरकिरे शांतुन, मोइत्र सुरज जगन मोनाली आणि ठाकुर्क मोहन यांनी जबाबदारी संभाळली आहे.

Leave a Comment