लंकेने उडविला ऑस्ट्रेलियाचा खुर्दा

ब्रिस्बेन येथील तिस-या वनडेत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ ७४ धावांत आटोपला आहे. नुवान कुलसेकराने भेदक गोलंदाजी करीत २२ धावात ५ विकेट्स घेतल्या. एकदिवसीय सामन्यातील ऑस्ट्रेलियाची ही तिसरी निचांकी धावसंख्या ठरली आहे. एवढ्या कमी धावसंख्येत ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळल्याने त्यांच्या समोर पराभवाचे संकट उभे टाकले आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी घातक ठरला. कांगारुंचे फलंदाज एकामागोमाग बाद झाल्याने त्यांचा डाव केवळ २२.४ षटकात ७४ धावातच आटोपला. श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराने २२ भेदक मारा करताना केवळ २२ धावात पाच विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडली. त्याला जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाने १४ धावात ३ विकेट्स घेत त्याला साथ दिली. त्याशिवाय मॅथ्यू आणि एरंगाने प्रत्येकी एक विकेट घेत कांगारुचा डाव सावरला. स्टार्क आणि डोहेर्थी यांनाच या सामन्यात दुहेरी धावसंख्या गाठता आली त्यामुळे कांगारुंनी किमान ७४ धावांची मजल मारता आली.

दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा लंकेने चार गडी बाद ३८ धावा केल्या होत्या. त्याना विजयासाठी अध्याप ३७ धावाची गरज असून आणखीन सहा फलंदाज शिल्लक आहेत.

Leave a Comment