बॉलीवुड अभिनेत्री कैटरिना कैफला सध्या सर्वजन लकी चार्म समजत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून तिचा भाव चांगलाच वधारला आहे. गेल्या काही दिवसापासून कैटच्या सिनेमाला जबरदस्त ओपनिंग मिळत असून त्यामुळे सर्वचजण तिला सिनेमात काम करण्याची संधी देत आहेत. सध्या तिला इतर अभिनेत्रीच्या तुलनेत खूपच लोकप्रियता मिळत असल्याने तिला सध्या बॉलीवूडची राणी समजले जात आहे.
कैटरिना ठरली बॉलीवूडची राणी
काही दिवसापूर्वी ट्रेड पत्रिकेने केलेल्या सर्वेक्षणनुसार ती बॉलीवुडची वन नंबर अभिनेत्री बनली आहे. हे सर्वेक्षण बॉलीवुडच्या लीडिंग एक्टर्सच्या टेरेटरी वाइस बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि त्यांच्या परफार्मेंसवर आधारित आहे. या सर्वेक्षणनुसार भारताच्या ट्रेड सेंटरचा अभ्यासानुसार करण्यात आले आहे. या सर्वेक्षाणानुसार कैटरीना नंबर वन बनली आहे. मुंबई, दिल्ली, यूपी, ईस्ट पंजाब, सीपी, सीआई, निजाम सर्किट, मैसूर, टीएनके, वेस्ट बंगाल, असम और उड़ीसा या राज्यात बॉक्स ऑफिसवर कैटरीना बेस्ट ओपनिंग एक्ट्रेस आहे.
गेल्या काही दिवसात तिचा ‘एक था टायगर’ आणि ‘जब तक है जान’ हे दोने सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळाल्याने हिट ठरले आहेत.
गेल्या काही दिवसपासून तीची गणना बॉलीवुडची सफलतम अभिनेत्री म्हनुन केली जात आहे. त्यासोबतच कैटरीनाची ओरमेक्स मीडिया द्वारा करण्यात आलेल्या सर्वेक्षणनुसार अभिनेत्री म्हणून सर्वाधिक वोट मिळाले आहेत. कैटरीना आता यशराज फिल्म्सच्या ‘धूम-३’ या सिनेमात आमिर खान सोबत झळकणार आहे. त्याशिवाय फॉक्स स्टार स्टूडियोजच्या ‘नाइट एंड डे’ च्या बॉलीवुड रिमेकमध्ये ती दिसणार आहे.
