विल्यम्स आणि केट दांपत्याला हवाय विश्वासू हरकाम्या

लंडन दि.१४ – पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी सज्ज असलेले लंडनचे रॉयल कपल विल्यम्स आणि केट यांना सुपर सर्व्हंट हवा असून त्यासाठी त्यांनी जाहिरातही प्रसिद्ध केली असल्याचे समजते. प्रथमच आईवडील बनत असलेल्या या जोडप्याने बकिगहॅम पॅलेस इंटरनल अॅडव्हटाईज मध्ये ही जाहिरात दिली असून या नोकराकडून त्यांना कोणत्या कामाच्या अपेक्षा आहेत त्याचाही उल्लेख यात केला गेला आहे.

या जाहिरातीनुसार घरातील सर्वकाम करणारा, घराच्या कानाकोपर्यायची स्वच्छता ठेवणारा, गरज असेल तर स्वयंपाक करणारा, शाही दांपत्याचे आणि जन्मास येणार्याह बाळाचे वॉर्डरोब मेनटेन करणारा, घरातील अन्य महागड्या वस्तूंची काळजी घेणारा, चांदीची भांडी, ग्लासेस सांभाळणारा, कत्र्यांना फिरविणारा आणि त्यांच्याकडून व्यायाम करून घेणारा, यूके वाहनचालक परवाना असलेला आणि गरज पडेल तेव्हा वाहनचालक बनणारा असा विश्वासू तसेच रॉयल दांपत्याचे खासगीपण जपणारा नोकर त्यांना हवा आहे.

पॅरॅशूट रेजिमेंटमधला फिनलंड येथे जन्मलेला ,लान्स कार्पोरल  प्रिन्सचा पहिला ऑडर्ली होता. तो वाहन चालविण्यासोबतच लॉजिस्टीक व प्रिन्सचा वॉर्डरोब सांभाळण्याचे काम करत असे. मात्र केट आणि विल्सम्स यांना त्यांचे खासगी आयुष्य जपायचे असल्याने त्यांना नोकरांचा ताफा नको आहे तर सर्व कामांसाठी एकच नोकर हवा आहे असे सांगण्यात येत आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध जोडप्यासाठी काम करणे हे कुणालाही प्रेस्टीजियस वाटेल असे समर्थन केले जात असले तरी आठवड्यातले ३७ कामाचे तास धरले तर त्यात सगळी कामे कशी होणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. अर्थात या जाहिरातीला १५ जणांकडून प्रतिसाद मिळाला असल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे अर्ज करण्यासाठी हाऊस किपिगचा अनुभव असल्याची गरज नसल्याचे नमूद करण्यात आले असून सर्व काम शिकण्याची तयार असणे गरजेचे आहे असे म्हणले गेले आहे.