कैटरीनाचे खेळावरील प्रेम

तसे पहिले तर बॉलीवूडमधील ऐक्ट्रेसेस शॉट संपल्यानंतर लगेचच वैनिटी वैन मध्ये जास्तीत जास्त वेळ घालविणे पसंद करीत असतात. मात्र या सर्व प्रकाराला अभिनेत्री कैटरीना कैफ मात्र अपवाद आहे. शुटींगचे काम पूर्ण झाल्यावर ती वैनिटी वैन मध्ये बसून राहत नाही. शूटचे काम संपल्यानंतर ती टाइम पास करण्यासाठी ती कुठला ना कुठला तरी गेम खेळत असते. तिचे ही खेळाविषयी असलेले प्रेम पाहून सर्वजन थक्क झाले आहेत.

नुकतीच यशराज फिल्म्स च्या एका सिनेमाच्या शूटिंगवेळी ती सेटवर कुठला ना कुठला तरी गेम खेळत असताना दिसली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाची शूटिंग रात्रीच्या वेळी होती. त्यामुळे दिवसाचा वेळ पूर्णपणे मोकळा होता. त्यामुळे स्पोर्टिंग कैटरीना कैफला चांगलीच संधी चालून आली. त्यामुळे तिने लगेचच हातात बट घेऊन यूनिटच्या मंडळी सोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. यापूर्वी पण कित्येक सिनेमच्या शुटवेळी ती कुठला ना कुठला तरी गेम खेळत असतना दिसते. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमातील एका सीनसाठी तिला वेडिंग गाउन घालायची होती. शॉट झाल्यानंतर कैट गाउन घालूनच बेसबॉल खेळत होती. त्यानंतर ‘राजनीति’ सिनेमाच्या वेळी पण ती शूटिंग झाल्यानंतर साडी घालूनच रनबीर कपूर आणि प्रकाश झा सोबत क्रिकेट खेळत होती.

आउटडोर शूटिंगवेळी तर नेहमीच कैटरीना खेळतानाच दिसत असते. तिच्या या खेळावरील प्रेमामुळे सिलेब्रिटी क्रिकेट लीग मध्ये ती डान्स करण्यासाठी खुशी-खुशी राजी झाली.

Leave a Comment