रणदीपमुळे झाली नीतू परेशान

सिनेअभिनेत्री नीतू चंद्रा गेल्या काही दिवसापासून खूपच परेशान झाली आहे. तिच्या परेशानीचे कारण दुसरे तिसरे कोण नसून ‘मर्डर-३’ या सिनेमाचा नायक रणदीप हुड्डा हा आहे. या सिनेमचा हिरो जर रणदीप हुड्डा असेल तर नीतू का परेशान झाली असेल असे सर्वाना वाटत असेल. मात्र नीतू रणदीपच्या अभिनयावर सध्या खुश नसून परेशान आहे. कारण की रणदीपने आगामी काळात येत असलेल्या ‘मर्डर-३’ या सिनेमात खूपच उत्तेजक दृश्य दिले आहेत.

या सिनेमातील काही हॉट सीन पाहून हॉटनेस अभिनेत्री असलेल्या नीतूला सुद्धा घाम फुटला आहे. त्यामुळेच सध्या नीतू खूपच परेशान आहे. तसे पहिले तर नीतूला परेशान होण्याची गरज नाही कारण की यापूर्वी रणदीप हुड्डाने ‘साहब, बीवी और गैंग्सटर’ हा सिनेमा केला होता. त्यामध्ये त्याने खूपच हॉट सीन दिले होते.

मात्र एकाद्या व्यक्तीवर आपण जर जास्त प्रेम करीत असेल तर नीतूला रणदीप हुड्डा कुठल्या अन्य अभिनेत्री सोबत हॉट सीन करीत असलेला कसा चालेल. ‘मर्डर-३’ हा सिनेमा १५ फेबुवारी २०१३ रोजी रिलीज होत आहे. भट्ट कैंपच्या “मर्डर-३’ या सिनेमात रणदीप हुड्डा, अदिति हैदरी, मोनालिसा हे लीड रोल करीत आहेत. सध्या या सिनेमातील एक गाणे यूट्यूबवर सर्वात जास्त वेळा पहिले जात आहे. त्याशिवाय ऱणदीप हु्डडा आणि पाकिस्तानी अभिनेत्री सारा लोरेन हिचे या सिनेमात खूपच हॉट सीन आहेत. त्यामुळेच या सिनेमाची खूपच चर्चा सुरु आहे.

Leave a Comment