जीजाजीला पाहवी लागतेय सलमानची वाट

‘बंधन’ या सिनेमातील सलमान खानची भूमिका तर सर्वाना माहित आहे. त्या सिनेमात सलमानचा एक फेमस डॉयलोग होता. ‘ जो जीजाजी कहेंगे वही करूंगा’ हा डायलॉग आजही आठवतो. मात्र रियल लाइफमध्ये वेगळेच घडत आहे. गेल्या काही दिवसपासून एका सिनेमाच्या शूट साठी जीजाजीला सलमान खानची देवासारखी वाट पाहवी लागत आहे.

काही दिवसापासून सलमानची एका सिनेमाच्या शूटिंगसाठी दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीला वाट पाहवी लागत आहे. अतुल सलमानची बहिण अलविराचा पती आहे. सलमान खान पॉलिटिकल व्यवस्थेवर आधारित या सिनेमात काम करीत आहे. अतुलच्या मते, ‘ या सिनेमात सलमान असल्याने खूप काही फरक पडणार आहे. तसे पाहिले तर मी त्याला लकी मैस्कॉट मानतो. सलमानला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस मला शुटींगची डेट फायनल करावी लागणार आहे.

या सिनेमाच्या दोन शेड्यूलची शूटिंग पूर्ण झाले आहे. यापुढील काळात तिस-या शेड्यूलमध्ये सलमानसोबत शूटिंग पूर्ण करण्याचे काम अजून अपूर्ण आहे. या सिनेमाची शूटिंग मुंबईमध्ये होणार आहे. हा सिनेमा सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. त्यामुळे अजून किती दिवस अतुलला सलमानची वाट पहावी लागणार आहे हे मात्र अनिश्चित आहे.