कॅसिनोत जाणाऱ्या राजकारण्यांवर गोव्यात वॉच

पणजी दि.१२ – गोव्यात प्रंचड संख्येने असलेल्या कॅसिनोत जुगार खेळायला येनाऱ्याची सतत वर्दळ असतेच. मात्र आपल्या ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिकची कमाई येथे उधळायला येनाऱ्या राजकारणी, न्यायालयातील अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, लष्करी अधिकारी यांना यापुढे कॅसिनोत जाताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण गोवा सरकारने पगारापेक्षा अधिक पैसा जुगारात लावनाऱ्यावर प्रतिबंध आणण्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरींग अॅक्टमध्ये नवीन दुरूस्ती केली आहे. त्यानुसार कॅसिनो मालकांना त्यांच्याकडे येनाऱ्या ग्राहकांची पूर्ण माहिती जाणून घेण्याचे तसेच नो युवर कस्टमर अर्ज भरून घेण्याचे अधिकार प्राप्त होत आहेत.

गोव्यात कॅसिनोत जानाऱ्या वरील यादीतील अधिकरयाची संख्या लक्षणीय असल्याचे कॅसिनोतील सीसीटिव्ही फूटेज तपासताना लक्षात आले होते. त्यामुळे येथे उधळायला या अधिकाऱ्याकडे पैसा कुठून येतो याचा विचार सुरू झाला. त्यातूनच वरील कायदा दुरूस्ती करण्यात आली असून कॅसिनो चालकाने येणार्या  ग्राहकाने जुगारासाठी पैसा कुठून आला याची खातरजमा करून घ्यावयाची आहे. त्यातही राजकारणी लोकांबाबत अधिक सर्तकता बाळगायची आहे असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.