अर्जुनला सामान्य खेळाडूचीच वागणूक द्या-सचिन

नुकतीच निवड समितीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मुंबईच्या १४ वर्षांखालील संघात निवड केली आहे . त्यामुळे सचीनला खुश व्हायला हवे होते. मात्र यावेळेस सचिनने अर्जुनला निवड समितीने एकाद्या सर्व सामान्य खेळाडूचीच वागणूक देण्याचे आवाहन केले आहे.

निवड समितीने पश्‍चिम विभाग क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाची घोषणा नुकतीच केली आहे . स्थानिक स्पर्धेत १२४ धावांच्या खेळीवर अर्जुन तेंडुलकरने या संघात जागा मिळवली. याबाबत बोलताना सचिन म्हणाला की, ‘ अर्जुनची संघात निवड झाली. यासाठी त्याचा वडील म्हणून मला खूप आनंद झाला आहे. पण त्याला सर्वांनी मनमोकळेपाने खेळू द्यावे.’ त्याच्याकडे ‘सचिन’चा मुलगा म्हणून न पाहण्याचे कळकळीचे आवाहन खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले आहे.

गेल्या काही दिवसपासून अर्जुन प्रचंड मेहनत करतो आहे. त्याचा फायदा संघ निवडीसाठी त्याला झाला आहे. आगामी कळत जा सर्वानीच त्याला सामान्य वागणूक देऊन क्रिकेटचा आनंद घेऊ द्यावा. त्याला कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक मिळणार नाही याची दक्षता सगळ्यांनीच घ्यायला हवी, असे सचिन यावेळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला.

Leave a Comment