आता सोनाक्षी थिरकणार आयटम सॉंगवर

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला ऊर्जा असलेल्या गाण्यावर नृत्य करायला आवडते. ‘ओ माई गॉड’ या सिनेमात तिने ‘गोविंदा’ या गाण्यावर थिरकताना तिला चांगला डान्स करता येतो हे सिद्ध करून दाखविले आहे. आगामी काळात येत असलेल्या दिग्दर्शक साजिद खानच्या ‘हिम्मतवाला’ या सिनेमात ती एका आयटम सॉंगवर थिरकणार आहे. त्यासाठी तिने या आयटम सॉंगवरवरच लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही दिवसापासून या आयटम सॉंगची शूटिंग सुरु झाली आहे.

या बाबत बोलताना अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणाली. ‘ मी दिग्दर्शक साजिदच्या ‘हिम्मतवाला’ या सिनेमात एक आयटम सॉंग करीत आहे. हे माझे गाणे पूर्णपणे वेगळे आहे. १९८० च्या दशकातील एक डिस्को गाणे आहे. वास्तव स्वरुपात हे गाणे सादर करणे म्हणजे एक कठीण काम आहे. त्यामुळे हे गाणे करी असताना उत्सुकता असल्याने बरेच काही शिकायला मिळाले. हे गमे माझ्या वडिलाचे नाही.’

एका अवार्ड कार्यक्रमात सहभागी होण्यसाठी ती याठिकाणी आली होती. त्यावेळी तिने एक ऊर्जावान गाने सादर करून सर्वांची मने जिंकली. या ठिकानच्या स्टेजवर अशा प्रकारचा डान्स करणे कठीण असल्याचे तिने सांगितले.

Leave a Comment