शमिने सोडले होते क्रिकेटसाठी घर

कारकीर्दीच्या दृष्टीने २०१२ हे वर्ष मोहंमद शमीसाठी महत्त्वाचे ठरले. त्याने रणजी सामन्यात बंगालच्या वतीने खेळताना पाच सामन्यांत २८ बळी घेतले होते. त्याच्या याच कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे शमीला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले. त्यांनी या संधीचे सोने केले. त्याने पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामण्यात एकापाठोपाठ एक चार मेडन ओव्हर टाकून शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव कमविले आहे. हे करीत असताना शमिला उत्तरप्रदेश येथील घर सोडून कलकत्ता येथे यावे लागले होते.

कोलकाता येथे आल्यानंतर त्याने नाइड रायडर्सच्या वतीने खेळणे खूपच उपयुक्त ठरले. पाकचा जलदगती गोलंदाज वसीम अक्रमकडून त्यांनी ती पास घेतल्या व त्याचा फायदा त्याला झाला. त्यामुळेच त्याला पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामण्यात एकापाठोपाठ एक चार मेडन ओव्हर टाक्तता आले. त्याच्या या गोल्न्दाजीमुळे भारताला हा सामना जिंकता आला.

त्याच्या या खेळीमुळे शमी आज उत्तर प्रदेशचा हीरो ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळून शमी परतला तेव्हा स्वागतासाठी तीस हजारांहून अधिक लोकांची गर्दी जमली होती. एवढे यश जरी शमिने आज मिळवले असले तरी त्यासाठी त्याला उत्तरप्रदेश येथील घर सोडून कलकत्ता येथे यावे लागले होते.

Leave a Comment