सायना नेहवाल दिमाखदार प्रदर्शनासाठी सज्ज

सायना नेहवालसाठी २०१२ हे वर्ष संस्मरणीय ठरले आहे. तिने या वर्षी ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले आहे. सायना कोरियन सुपर सीरिजमधून नवीन वर्षांची दणक्यात सलामी करण्यासाठी सज्ज झाली आहे. वर्षांतल्या पहिल्याच सुपर सीरिज दर्जाच्या स्पर्धेत दिमाखदार प्रदर्शनासाठी सायना आतुर आहे.
गेल्या काही दिवसपासून गुडघ्याच्या दुखापतीमुले त्रस्त झाली होती. आता मात्र या दणक्यातून ती सावरली आहे.

आता दुखापतीवर मात करीत चांगला खेळ करण्याचा सायनाचा प्रयत्न असणार आहे. अनुकूल असा ड्रॉ सायनाला मिळाला आहे. थायलंडच्या सॅपसिरी तेअरटानचायशी सायनाची पहिली लढत आहे. प्राथमिक फे-यांचा अडथळा पार केल्यास उपांत्यपूर्व फेरीत सायनासमोर थायलंडची युवा रतचंन्नोक इनथॅनॉनचे आव्हान असेल. रतचंन्नोकला नमवल्यास सायनाला उपांत्य फेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेती लि झेरूईचा मुकाबला करावा लागू शकतो. त्यामुळे या सामन्यात स्यानाचे पारडे थोडेसे जड असणार आहे.

याशिवाय कोरियन सुपर सीरिज पुरुष खेळाडूंमध्ये पारुपल्ली कश्यपची सलामीची लढत इंग्लंडच्या राजीव ओयुसफशी होणार आहे. राजीवने २०१० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कश्यपला नमवले होते, मात्र गेल्या वर्षी झालेल्या चीन मास्टर्स स्पर्धेत कश्यपने या पराभवाचा बदला घेत विजय मिळवला होता. डिसेंबरमध्ये झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा कश्यप जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे कश्यपकडून ब-याच अपेक्षा आहेत.

Leave a Comment