इंग्लंडची दमदार सुरुवात

राजकोट येथील नव्या स्टेडियमवरील भारताविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाच्या सलामी जोडीने दमदार शतकी भागीदारी केली. परंतु त्यानंतर इंग्लंडचे इयान बेल आणि पीटरसन लवकरच बाद झाले. इयानने नऊ चौकार आणि एक षटकाच्या मदतीने ८५ धावा केल्या. त्याने कुकला चांगली साथ दिली. परंतु रहाने याने त्याला धावबाद केले. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा इंग्लंडने दोन गडी बाद १८९ धावा केल्या होत्या.

या सामन्यातून आपल्याच भूमीवर इंग्लंडकडून कसोटी मालिका गमावल्यानंतर आणि पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका हरल्यानंतर टीम इंडिया पुन्हा विजयी ट्रॅकवर परतण्याचे आव्हान आहे. पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाला आता आजपासून इंग्लंड टीमचा सामना करण्यासाठी मैदानात उतरला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडीयात एक बदल करण्यात आला असून जलदगती गोलंदाज शमी अहमदच्या जागी अशोक डिंडाला संधी देण्यात आली आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड संघाच्या सलामी जोडीने दमदार शतकी भागीदारी केली. त्यानंतर मात्र इंग्लंडचे इयान बेल आणि पीटरसन लवकरच बाद झाले. इयानने नऊ चौकार आणि एक षटकाच्या मदतीने ८५ धावा केल्या. त्याने कुकच्या मदतीने चांगली साथ दिली. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा इंग्लंडने ३६ षटकात दोन गडी बाद १८९ धावा केल्या होत्या. एलिस्टर कुक (७५) आणि इयानने (८५) धावा काढून बाद झाले होते.

Leave a Comment