फेसबुकवरून करा मोफत कॉल

लंडन: सोशल नेटवर्किंग साईट्सच्या वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी नावीन्यपूर्ण सुविधा देण्याची चढाओढ सुरू आहे. याच स्पर्धेचा एक भाग म्हणून फ़ेसबुकने आपल्या वेबसाईटवरून मोफत फोनकॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या ही सुविधा केवळ कॅनडा येथील फेसबुकधारकांना उपलब्ध असली तरीही वर्षभरात सर्व फेसबुकधारक ही सुविधा वापरू शकणार आहेत. ‘

‘व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल’ या तंत्रज्ञानावर आधारित ही सुविधा फेसबुकवरील ‘कॉल अ फ्रेंड’ या अ‍ॅप्लिकेशनद्वारे उपलब्ध होणार आहे.

इतर काही वेबसाईट्सवर अशा प्रकारे मोफत कॉल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये ही सुविधा देणारी फेसबुक ही पहिली साईट असल्याचा फेसबुकचा दावा आहे.

या सुविधेमार्फत केल्या गेलेल्या प्रत्येक कॉलवरील संभाषण फेसबुकच्या सर्व्हरवर सेव्ह करता येईल. त्याचप्रमाणे या सुविधेद्वारे कॉन्फ़रन्स कॉलही करता येणार आहे.

Leave a Comment