कोरियन इलेक्ट्रोनिक्स कंपनी सॅमसंगने त्यांचा गॅलॅक्सी एस फोर हा नवा स्मार्टफोन मे २०१३ मध्ये बाजारात उतरविण्याचे ठरविले असल्याचे वृत्त आहे. या फोनची छायाचित्रेही वेबसाईटवर लिक झाली आहेत आणि ती खरी असतील तर हा फोनही गॅलॅक्सी एस थ्री प्रमाणेच असेल असे सांगितले जात आहे. अर्थात तो अनब्रेकेबल आणि लवचिक असेल असेही कांही जणांचे म्हणणे आहे. ४.९९ इंचाचा सुपर एमोलेड टच स्क्रीन आणि १३ मेगापिक्सलचा कॅमेरा ही त्याची अन्य वैशिष्ठे असतील असाही तर्क लढविला जात आहे.
सॅमसंगने त्यांच्या स्मार्टफोन क्षेणीतील गॅलेक्सी एस थ्री मे २०१२ मध्ये बाजारात आणला आहे आणि या मॉडेलसाठी पूर्ण वर्षाचा कालावधी देण्याचा निर्णय कंपनीने यापूर्वीच घेतला असल्याने नवा एस फोर मे २०१३ पूर्वी नक्कीच बाजारात आणला जाणार नाही असे कंपनीतील वरीष्ठ अधिकार्यां चे म्हणणे आहे. या फोनवर होम बटण असणार नाही तर उपकरण सुरू बंद करण्यासाठी ऑन स्क्रीन बटणांचाच वापर करावा लागणार आहे असेही समजते.
कंपनीने त्यांचा गॅलेक्सी एस व एस टू अनुक्रमे जून २०१० व एप्रिल २०११ ला बाजारात आणले होते.