आगामी काळात येत असलेल्या एका सिनेमात ‘स्टूडेंट ऑफ द इयर’ फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीति चोप्रा रोमांस करताना दिसणार आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एडमैन मैथ्यू एक सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात त्यांनी लीड पेयर म्हणून परिणीति आणि सिद्धार्थ यांची निवड केली आहे.
या प्रॉजेक्टशी साम्भ्डीत असलेल्या सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार हा सिनेमा लव-स्टोरी वर आधारित आहे.या सिनेमाची स्टोरी मैथ्यूने डिवेलप केली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्य प्रॉडक्शन साठी दिग्दर्शक करण जौहर आणि अनुराग कश्यप या दोघांनी मदत केली आहे. त्यामुळे आता बॉलीवूड मध्ये नव्याने एन्ट्री करणा-या सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीति चोप्रा या नवीन जोडीला संधी देण्यात आली आहे.
मैथ्युने या सिनेमासाठी सिद्धार्थला घेण्यचे ठरविले त्यावेळी बॉलिवुडमध्ये डेब्यू करीत असलेल्या व कास्टिंग एकदम परफेक्ट असलेल्या अभिनेत्याला संधी देण्याचे ठरले होते. या वेळेस परिणीतिला घेण्यचेही त्याने प्लैनिंग केले आहे. त्यामुळे मोठ्या पडध्यावर सिद्धार्थ आणि परिणीतिचा रोमांस आता दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरु होणार आहे.