सुपरस्टार सलमान खान होस्ट असलेल्या ‘बिग बॉस’ च्या साहव्या भागाच्या फायनलमध्ये अभिनेता इमरान हाशमी, प्रभुदेवा आणि रेमो डिसूजा ही सर्व मंडळी उपस्थित राहणार आहे. या रियलिटी शोच्या अंतिम भागत ही सर्व मंडळी आगामी काळात येत असलेल्या त्याच्या सिनेमाचा प्रचार करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
सलमान खानच्या ‘वांटेड’ या बहुचर्चित सिनेमाचा दिग्दर्शक प्रभुदेवा ‘बिग बॉस’ च्या फायनल मध्ये त्याचा आगामी काळात येत असलेल्या थ्री डी डांस ‘ए.बी.सी.डी.-एनीबॉडी कैन डांस’ या सिनेमातील गाण्यावर थिरकणार आहे. त्याचा वेळी अभिनेता इम्रान हाशमी त्याचा ‘एक थी डायन’ या सिनेमाचा प्रचार करणार आहे. त्याशिवाय या सिनेमाचे निर्माता विशाल भारद्वाज आणि दिग्दर्शक एकता कपूर हैं देखील सहभागी होणार आहे.
‘बिग बॉस’ चा फायनल भागाचे प्रसारण कलर्स चैनलवर १२ जानेवरीला करण्यात येणार आहे. त्याशिवाय सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर मंडळी या वेळी सह्बागी होणार आहेत. त्याशिवाय ‘बिग बॉस’ च्या या फायनलसाठी ‘बिग बॉस’ मध्ये आता पर्यंत सहभागी झालेल्या मंडळीना ही आमंत्रित करण्यात आले असल्याचे समजते.