आगामी काळात दिग्दर्शक प्रभू देवा शाहिद कपूरला घेऊन ‘रेम्बो राजुकमार’ या सिनेमाची निर्मिती करीत आहे. प्रभु देवाच्या मते हा एक मसाला सिनेमा आहे. त्यामुळेच दर्शकाला अट्रैक्ट करण्यासाठी या सिनामाचे टायटल ‘रेम्बो राजकुमार’ असे निवडले आहे. हे टायटल या सिनेमाची कहानी आणि अक्टरच्या हिशोबाने फिट बसत आहे.
प्रभुदेवाने यापूर्वीच ‘वॉन्टेड’ आणि ‘राउडी राठौर’ सारखी मसलेदार सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचे टायटल हेच भूमिका प्रजेंट करण्याचे महत्वाचे काम करीत आहे. ‘वॉन्टेड’ आणि ‘राउडी राठौर’ आणि या सिनेमाचे टायटल खूप विचार करून फायनल करण्यात आले होते. त्यमुळे या सिनेमाच्या टायटल वरून कसलाच चान्स घेण्यची इच्छा त्याची नव्हती. शाहिद या सिनेमात राजकुमारचा रोल करीत आहे.
यापूर्वी प्रभू देवाच्या या सिनेमाचे टायटल ‘नमक’ असे होते. १९९६ मधील संजय दत्तच्या एका सिनामाचे नाव ‘नमक’ असेच होते. हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. या सिनेमातील शाहिद कपूरचा रोल २००९ मध्ये आलेल्या विशाल भारद्वाजच्या ‘कमीने’ या सिनेमासारखा आहे. या सिनेमात शाहिदच्या ऑपज़िट सोनाक्षी सिन्हा काम करीत आहे. या सिनामचे शूट जानेवरी-फेबुवरीमध्ये सुरु होणार आहे. प्रभुदेवाचा हा ‘रेम्बो राजकुमार’ हा सिनेमा एकंदरीत मनोरंजनाचा तडका असून यात मध्यप्रदेशमध्ये चाललेला ड्रगचा धंदा दाखविण्यात आला आहे.