हिलरींना मिळाली सरप्राईज गिफ्ट

वॉशिग्टन दि.८ -अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी किलंटन दुखण्यातून बरया होऊन कार्यालयात परतल्यानंतर त्यांच्या सहकरयानी त्यांना सरप्राईज गिफ्ट देऊन चकीत केले. अर्थात या गिफटने आनंदलेल्या हिलरी यांनी गिफ्ट बद्दल आभार मानून त्वरीत कामाला सुरवात केली.

मागच्या महिन्यात पोटातील संसर्गामुळे डिहायड्रेशन होऊन चक्कर येऊन पडल्याने हिलरी यांच्या डोकयाला मार  लागला होता. यामुळे त्यांच्या मेंदूत रक्ताची गुठळी तयार होऊन त्यांना बधीरपणा जाणवू लागला होता. तेव्हा त्यांना रूग्णालयात दाखल केले गेले होते. तेथील उपचारानंतर हिलरी आता पूर्ण बर्याग झाल्या असून या दुखण्यानंतर प्रथमच हिलरी कार्यालयात कामावर आल्या. त्यांनी सदस्यांची बैठक घेऊन चर्चाही केली.

दरम्यान हिलरी यांना सदस्यांनी भले थोरले खोके भेट म्हणून दिले. त्यात फूटबॉल खेळताना घालतात तसले पांढरे हेल्मेट होते. त्यावर स्टेट डिपार्टमेंटचा शिककाही आहे. या हेल्मेट बरोबरच त्यांना जर्सीही देण्यात आली असून त्यावर मागे त्यांचे आडनांव आणि ११२ हा आकडा आहे. हा आकडा म्हणजे हिलरी यांनी भेटी दिलेल्या देशांची संख्या आहे असे प्रवक्त्या व्हिक्टोरिया न्यूलंड यांनी सांगितले.

हिलरी याच महिन्यात आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत.

Leave a Comment