बलात्काराचे सत्र सुरूच

कंकर: छत्तीसगडमधील नहारपूर येथील शासकीय आश्रमशाळेत असलेल्या ११ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून या अश्रमशळेतॆल शिक्षक आणि रखवालदाराला कंकर पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी ४ विद्यार्थिनींवर बलात्कार झाला असून सर्व मुली अल्पवयीन आहेत; अशी माहिती पोलिसांनी दिली.

नहारपूर येथील निवासी आश्रमशाळेत एकून ७५ विद्यार्थिनी राहतात. यापैकी ११ विद्यार्थिनींचे एक शिक्षक आणि रखवालदार एक वर्षापासून लैंगिक शोषण करीत असल्याची तक्रार कंकरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सी. डी. टंडन यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करून या प्रकरणाचा तपास केला आणि शिक्षक आणि रखवालदाराला जेरबंद केले. या ११ जणीपैकी चार जणींवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले.

खुद्द राजधानी दिल्लीतही अल्पवयीन मुलाने शेजारच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीला आली आहे. मयूर विहार परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोघांनी बलात्कार केला. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे.

पीडीत मुलगी नवव्या इयत्तेत शिकत असून ती १५ वर्षाची आहे. शुक्रवारी ती घरात एकटी असताना तिच्या शेजारी राहणारा एक अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मित्र तिच्या घरात घुसले आणि त्यांनी या मुलीवर बलात्कार केला. या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन हे दोघे तिच्या घरातून निघून गेले. पालक घरी आल्यानंतर पीडीत मुलीने त्यांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. त्यांनी पीडीत मुलीबरोबर पोलीस ठाण्यात जाऊन सामूहिक बलात्काराची तक्रार दिली.

या तक्रारीवरून दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Comment