आता रणबीर होणार मुंगेरीलाल

‘सत्याग्रह’ या सिनेमानंतर दिग्दर्शक प्रकाश झा आता काही दिवसापुर्वी पॉप्युलर झालेल्या टीवी सीरियल ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ याला सिल्वर स्क्रीन वर आनण्याचा प्लैनिंग करीत आहेते. १९८९-९० साली दर्शकाच्या मनावर राज करणा-या या टीवी सीरियलमध्ये रघुवीर यादवने वर्किंग क्लासच्या ड्रीमरमध्ये लीड रोल केला होता. मातर आता या रोलसाठी प्रकाश झा मॉडर्न मुंगेरीलाल म्हणून रणबीर कपूरला प्रेक्षकाच्या समोर आनण्याचा विचार ते करीत आहेत.

प्रकाश झा म्हणाले, ‘ सिनेमात कॉमिडी असणे आता प्रत्येक सिनेमाची गरज झाली आहे. सध्या प्रेक्षक जीवनात अनेक दुख सहन करीत आहेत. त्यामुळे यामधून वेळ घालविण्यासाठी कॉमेडीचा डोस आता उपयोगी पडत आहे. मला माहित नाही की काहीजन सीरियस सिनेमाची अपेक्षा फक्त माझ्याकडून का करीत आहेत.मात्र मी त्यांच्या चेह-यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करीत आहे. २३ वर्षापूर्वी मुंगेरीलालने सर्वाना खूप हसविले होते. त्यामुळेच मी हा सिनेमा आता लवकरच एक्सप्लोर करण्याचा विचार करीत आहे ‘

दरम्यान , या सिनेमात कॉमिक टाइमिंग्स आणि भोळा भाबडा चेहरा घेऊन मुंगेरीलालचा रोल आता रणबीर कपूर करणार आहे. आगामी काळात तो हा रोल कशा प्रकारे साकारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. हा रोल करण्यासाठी रणबीरने होकार दर्शविला असल्याचे समजते. मात्र त्यासाठी आणखीन काही दिवस वाट पाहवी लागणार आहे.

Leave a Comment