सैफमुले करीना झाली रिजर्व

अभिनेत्री करीना कपूरची ओळख तसे पहिले तर एक बिंदास आणि मस्त युवती म्हणून आहे. मात्र गेल्या काही दिवसापुर्वी तिचे लग्न झाले आणि त्यानंतर सर्वजन तिच्या मध्ये बदल झाले असल्याचे सांगत आहेत. असे म्हणना-यात तीच्या काही जवळच्या मित्राचा देखील समावेश आहे. गेल्या काही दिवसापासून करीना पूर्वीपेक्षा जास्तच रिजर्व झाली आहे.

काही दिवसापूर्वी एका मुलाखती दरम्यान करीनाने म्हटले होते की, सिनेमाशिवाय एक रीयल लाईफ आहे ते मी मनसोक्तपणे एन्जोय करणार आहे. असे म्हणून थोडेच दिवस उलटले आहेत तोच तिच्यात बदल झालेला पहावयास मिळत आहे. त्यासाठी करीनावर नवाब परिवारचा दवाब आलेला दिसत आहे. त्याशिवाय तिला आता ती पदौदी खानदानची सून झाल्याची जाणीव देखील झाली असणार आहे. त्यामुळेच करीनाने तिच्या मित्रांना भेटणे कमी केले आहे. त्याशिवाय काही विशिष्ट प्रकारच्या निर्माता- दिग्दशकाची सिनेमे साइन करण्यास नकार दर्शविला आहे. येणा-या सिनेमात ती एक्सपोज होईल असे काम करणार नाही. त्यामुळेच तिने काही मोठे प्रोजेक्ट सुद्धा नाकारले आहेत.

काही दिवसापुर्वी तिने एका फाईव्ह स्टार होटलमध्ये नवीन वर्षाच्या पार्टीत डान्स करण्यास नकार दर्शविला होता. यासाठी करीनाला आठ कोटी रूपये मिळणार होते. शर्मिला टैगोरने पटौदी खानदानची सून आता होटलमध्ये नाचणार नाही म्हणून तिने ही ऑफर नाकारली होती. तिने जर नाही म्हटले तरी लग्नाचा परिणाम तिच्या कामावर झाल्याचे जाणवत आहे.

Leave a Comment