सिनेमासाठी गडबड करणार नाही -करिश्मा

संजय कपूर सोबत लग्न केल्यानंतर करिश्मा कपूर काही दिवसासाठी दिल्लीमध्ये आली होती. मात्र परत ती मुंबईला गेली आहे. त्यानंतर काही दिवसातच संजय आणि करिश्माच्या रिलेशनशिपवरून किती तर अफवा पसरल्या होत्या. त्याची सुरुवात दुसरा मुलगा झाल्यापासून झाली होती. लोलो अधून -मधून दिलीला येते तेंव्हा तिच्या रिलेशनशिपबाबत बरेच प्रश्न विचारले जातात. मात्र या सर्व प्रश्नांना ती नो कमेंट असेच उत्तर देत असते.

तसे पहिले तर करिश्माला तिच्या समायरा आणि कियान या मुळापासून काहीच प्रॉब्लम नाही. ती म्हणते, ‘ मी माझ्या लहान मुलासोबत बिजी आहे. दोन्ही मुले क्रिकेट आणि फुटबॉल खेळणे पसंत करतात. त्यांच्या सोबत मला पण खेळायला आवडते. मदरहुडच्या सर्व फेजचा इंजॉय करीत आहे. माझा दिवसातील बरचसा टाइम त्यांच्या सोबत इंजॉय करण्यातच जातो. त्यामुळे मला जास्त विचार करण्यास वेळ मिळत नाही.’

सिनेमाच्या बाबतीत बोलताना करिश्मा म्हणाली, ‘मी सिनेमात काम करणे बंद केली नाही, मात्र त्यासाठी मला कसलीच गडबड नाही. ज्यावेळेस मला चांगली ऑफर येईल त्यावेळी मी काम करण्याबाबत निर्णय घेइन. सध्या मी दोन मुले व फैमिलीसोबत बीजी आहे. मी माझा जास्तीत जास्त वेळ त्याच्या सोबत घालवीत आहे.’ लोलोकडे सध्या ब्रैंड एंडोर्समेंटच्या ब-याच ऑफर आहेत. त्या माध्यमातून तिला फैन्स सोबत जोडण्याची संधी मिळत असल्याने ती खुश आहे.

Leave a Comment