विवाहितेचा सामूहिक बलात्कार करून खून

कोलकाता: दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाने सारा देश संतप्त असतानाच पश्चिम बंगालमध्ये एका विवाहित महिलेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार करून तिचा खून केला. तिच्या पतीला मारहाण करून या नराधमांनी त्याच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकले.

उत्तर २४ परगणा जिल्ह्यात ही अमानुष घटन घडली. बरसात या गावात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून गुंडांच्या टोळक्याने तिला घराबाहेर ओढून आणले आणि तिच्यावर अमानुष बलात्कार केला. त्यानंतर निर्घृणपणे तिचा खून केला. तिच्या पतीलाही या गुंडांनी मारहाण करून त्याच्या चेहेऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. तो गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Comment