‘वाटेड’ आणी ‘रावडी राठोड’ सारखे ब्लॉकब्लास्टर सिनेमाची निर्मिती करणारा दिग्दर्शक प्रभू देवा सध्या नवीन सिनेमाची निर्मिती करीत आहे. हा सिनेमा अकशन आणि कॉमेडी असा राहणार आहे. या सिनेमात लीड रोल अभिनेता अजय देवगण करणार असून त्याच्या सोबत पहिल्यादाच अभिनेत्री दीपिका पादुकोण झळकणार आहे. त्यामुळे येत्या काळात मोठ्या पडद्यावर पहिल्यादाच अजय-दीपिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे.
दीपिकाने आतापर्यंत अभिनेता अजय देवगन सोबत व दिग्दर्शक प्रभुदेवा सोबत एकाही सिनेमात काम केले नाही. आता तीला या सिनेमाच्या माध्यामातून काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रभुदेवाच्या मते अजय-दीपिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री धमाल माजवणार आहे. तसे पहिले तर गेल्या काही दिवसापासून प्रभु देवाची ओळख ऑनस्क्रीन वर नवीन सिनेमा करणारा दिग्दर्शक अशी झाली आहे. त्यामुळे नेहमीच तो ऑनस्क्रीन केमिस्ट्री बनविण्यास प्राधन्य देत असतो.
त्याने त्याच्या ‘वांटेड’ या बहुचर्चित सिनेमातून सलमान खान आणि आयशा टाकिया यांची जोडी पडद्यावर झळकावली होती. प्रभू देवाच्या या आगामी काळात येत असलेल्या सिनेमात हीरोचा रोल खुपच दमदार असणार असून त्या तुलनेत हीरोइन थोडिसी इमोशनल दाखविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात दीपिका ही अजय सोबत रोमांस करताना दिसणार आहे. मोठ्या पडद्यावर दीपिका आणि अजयची जोड़ी प्रेक्षक कितपत पसंत करणार यासाठी आणखीन काही दिवस तरी वाट पाहवी लागणार आहे.