फ्लेचरच्या जागी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु

गेल्या काही दिवसापासून टीम इंडियाची कामगिरी कोणाला ही पाहवत नाही. गेल्या कित्येक वर्षानंतर टीम इंडियाला घरच्या मैदानावर सुद्धा पराभव सहन करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून बीसीसीआयकडून नव्या प्रशिक्षकाचा शोध घेतला जात आहे. सध्याचे टीम इंडियाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा मार्चअखेरपर्यंत मुदत संपत आहे. आगमी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता आतापासूनच नव्याने टीम इंडियाची बांधणी करावी लागणार आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शोध मोहिम सुरु केली असल्याचे समजते.

टीम इंडियाला विश्वविजेता बनवणा-या दक्षिण आफ्रिकेच्या कर्स्टननंतर प्रशिक्षकपदाची जबाबदारी फ्लेचरकडे सोपवण्यात आली. मात्र, फ्लेचर यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी फारसी प्रभावी ठरली नाही. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध कसोटीपाठोपाठ क्रमवारीतील अव्वलस्थान सुद्धा गमावले. त्या नंतरची आस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाही भारताने गमावली. त्यानंतर घरच्या मैदानावरही भारताला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत टीम इंडियाला आठ वर्षानंतर पराभूत व्हावे लागले. यासह इंग्लंड आणि पाकविरूद्धची टी-२० मालिका सुद्धा बरोबरीत सुटली.

या पराभवाच्या मालिकेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु केला आहे. प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा मार्चअखेरपर्यंत करारही संपणार आहे. त्यामुळे सध्या तर त्यांना मुदतवाढ देण्याचा बीसीसीआयचा कोणताही विचार नसल्याचे समजते.

Leave a Comment