बिपाशा-हरमनची जोडी चर्चेत

अभिनेता जॉन अब्राहम सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री बिपाशा बसुचे नाव अनेका सोबत जोडले गेले. त्यानंतर जॉनने त्याच्या रिलेशनशिप स्टेटस लगेच अपडेट केले. जॉन लवकरच तिच्या मैत्रणीसोबत लग्न करण्याची प्लैनिंग करीत असल्याची चर्चा सध्या इंडस्ट्रीज मध्ये ऐकावयास मिळत आहे. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर बिपाशाने बरेच दिवस सिंगल राहणे पसंत केले.

तसेतर बिपाशामध्ये सुद्धा काही कमी नाही. राणा दागुबातीसोबत बरेच दिवस तिचे नाव जोडले जात होते. मात्र बिपाशा नेहमीच मी सिंगल आहे असे म्हणत असल्याने त्य दोघाचे पण कोठेतरी बिनसले. त्यामुळे परत तिचे सिंगल स्टेटस परत आले. मात्र गेल्या काही दिवसापासून तिचे हे सिंगल स्टेटस पुन्हा एकदा चेंज झाले आहे. बिपाशा रितिक रोशन सारखा दिसत असलेल्या हरमन बावेजा सोबत जैकी भगनानीच्या क्रिसमस पार्टीमध्ये सहभागी झाली होती. मात्र यावेळी पार्टीत सहभागी झालेल्या अन्य पाहुण्याची नजर मात्र त्या दोघांवरच होती.

सूत्राने दिलेल्या माहिती नुसार, हरमन आणी बिपाशा दोघेपण एकाच गाडीतून आले होते. पार्टीमध्ये पूर्ण वेळ सोबतच होते. त्या दोघांची जोडी पार्टीमध्ये उठून दिसत होती. मात्र बिपाशाच्या मते हे दोघेजन केवळ मित्र आहेत. मात्र भविष्यात ते दोघे लग्न करणार की परत सिंगल राहणार याची कल्पना कोणालाच नाही.