अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

कुरुक्षेत्र: अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील सहाध्यायी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

येथील खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. टेकच्या अभ्यासक्रमात शिकत असलेली दलित विद्यार्थिनी ट्यूशनला निघाली असता तिच्या वर्गातील एका युवकाने तिला रस्त्यात अडविले आणि जबरदस्तीने आपल्या कारमध्ये घेतले. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा युवक तिला त्याच ठिकाणी सोडून निघून गेला. या विद्यार्थिनीने घरी येऊन आपल्या पालकांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली.

पीडीत विद्यार्थिनीच्या वैद्यकीय तपासणीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरिंदर सिंग यांनी दिली.

Leave a Comment