लिएंडर पेस हॅट्ट्रिक करणार

आजपासून चेन्नई येथे एटीपी टेनिस स्पर्धेच्या ओपनला दिमाखात प्रारंभ होत आहे. टेनिससाठीची भारतातील ही एकमेव स्पर्धा आहे. त्यामुळे भारतातील सर्वच टेनिस प्रेमीचे या महत्वाच्या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिले आहे. लिएंडर पेसला यावेळेस किताबाची हॅट्ट्रिक करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे या स्पर्धेत लिएंडर पेस किताबाची हॅट्ट्रिक पूर्ण करेल असे वाटते.

चेन्नई येथिल एटीपी टेनिस स्पर्धेत एकून पाच भारतीय टेनिसपटूंच्या जोड्या सहभागी झाल्या आहेत. या जोड्या वेगवेगळ्या जोडीदारांसोबत खेळणार आहेत. मात्र, यामधील कोणाती जोडी विजयी ठरणार याची उत्सुकता मात्र शिगेला पोहचली आहे. तसे पहिले तर या स्पर्धेत भूपती-नेस्टरला सोळा टीमच्या ड्रॉमध्ये अव्वल मानांकन देण्यात आले आहे. त्यानंतर पेस-रॉजर जोडीचा दुसरा क्रमांक लागतो. तिस-या क्रमांकाचे मानांकन बोपन्ना-राजीव या जोडीला मिळाले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू महेश भूपती पाचव्या क्रमांकाचा दुहेरीचा खेळाडू डॅनियल नेस्टरसोबत खेळणार आहे. या स्पर्धेचा गतविजेता असलेला लिएंडर पेसने फ्रान्सचा एडवर्ड रॉजर वेसेलिन हा जगातील तिस-या क्रमांकाचा खेळाडू जोडीदार असणार आहे. तर बोपन्नाचा जोडीदार राजीव राम हा आहे. लिएंडर पेसला यावेळेस किताबाची हॅट्ट्रिक करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे या स्पर्धेत लिएंडर पेस किताबाची हॅट्ट्रिक करण्यात यशस्वी ठरतो का ते येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

Leave a Comment