पोलिसांच्या त्रासाने बलात्कारित युवतीची आत्महत्या

पतियाळा:पोलिसांकडून सहकाऱ्य मिळण्याऐवजी प्रकरण मिटविण्याचा दबाव आल्याने सामुहिक बलात्काराला बळी पडलेल्या युवतीने आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी करून एक आठवड्यात अहवाल सदर करण्याचे आदेश पंजाब सरकारने पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

दिवाळीच्या दरम्यान पतियाळा येथील १७ वर्षीय युवतीवर दोघांनी बलात्कार केला होता. या प्रकरणाची वाच्यता न करण्याची धमकी मिळूनही पीडीत युवतीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मात्र संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दाखल न घेता उलट पीडीत युवतीला वारंवार पोलीस ठाण्यावर बोलावून त्रास देण्यास सुरुवात केली. गुन्हा दाखल करण्याऐवजी पैसे घेऊन अथवा बलात्कार करणाऱ्यांपैकी एकाशी लग्न करून प्रकरण मिटविण्यासाठी पोलीस दबाव आणत होते; असा आरोप पीडीत युवतीच्या बहिणीने केला.

या त्रासाला कंटाळून पीडीत युवतीने बुधवारी रात्री विष प्रश्न करून आत्महत्या केली. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Leave a Comment