टी-२० सामन्यात भारताला बरोबरीची संधी

भारत-पाक दरम्यानचा दुसरा टी-२० सामना अहमदाबाद येथे शुक्रवारी खेळला जाणार आहे. बंगळुरू येथील पहिला सामना जिंकून पाकने दोन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती. ही मालिका जिंकण्याची संधी तर टीम इंडियाला नाही. मात्र, हा दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी टीम इंडियाला आहे.

दरम्यान, गुरुवारी अहमदाबाद येथे दोन्ही संघांनी कसून सराव केला. कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला हा सामना जिंकावा लागणार आहे. भारताने इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना जिंकाल होता तर दुसरा सामना हरल्याने ही टी-२० मालिका बरोबरीत सुटली होती. त्यानंतर बेंगलोर येथील पाकविरुद्धचा पहिलाच सामना टीम इंडियाने गमावला होता. हा सामना गमवला तर भारतातच टीम इंडियाच्या पराभवाची हॅट्ट्रिक होणार असल्याने थोडेसे दडपण त्यांच्यावर असणार आहे.

दुसरा टी-२० सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. सामना जिंकण्यास्ठी टीम इंडियाची मदार पुन्हा फलंदाजांवर असणार आहे. भारताकडून सलामीवीर गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे, मधल्या फळीत विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, युवराज आणि धोनीकडून झटपट उपयुक्त योगदानाची संघाला आशा आहे. दुबळी गोलंदाजी ही मात्र, भारतासाठी निश्चितपणे चिंतेची बाब आहे. पण पहिल्याच सामण्यात भूवनेश्वर कुमारने चांगली गोल्नादाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचप्रमाने या सामन्यात आर अश्विनला घ्यावे लागणार आहे, तरच टीम इंडियाला हा सामना जिंकता येणार आहे.

Leave a Comment