गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये सिनेमाचे नाव बदलण्याचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे निर्माते मंडळी रिलीज होण्यापूर्वी सिनेमाचे नाव कित्येकवेळा बदलत असतात. तर काही जन सिनेमाचे शूट पूर्ण झाल्यानंतर सिनेमाचे नाव ठरवितात. आता प्रभूदेवानेच त्याच्या ‘नमक’ या सिनामाचे नाव बदलून ‘रैंबो राजकुमार’ असे ठेवले आहे.
प्रभुदेवाच्या आगामी काळात येत असलेल्या या सिनेमात शाहिद कपूर लीडिंग रोल करीत आहे. प्रभू देवाने त्याच्या या सिनेमाचे नाव ‘नमक’ असे ठेवले होते. हे नाव सगळीकडे फेमसपण झाले होते. मात्र काही दिवसापूर्वीच त्याचे नाव बदलून त्याने ‘रैंबो राजकुमार’ असे ठेवले आहे. या सिनेमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या अपोजिट शाहिद कपूर काम करीत आहे.
सूत्रोंने दिलॆल्या माहितीनुसार हा एक एक्शन एंटरटेनर सिनेमा आहे. त्यामुळे त्याचे नाव बदलून प्रभूदेवाने ‘रैंबो राजकुमार’ असे ठेवले आहे. आतापर्यत अक्षय आणि सलमान सोबत सोनाक्षी सिन्हाची जोडी चांगली जमली होती. तिचा ‘जोकर’ हा सिनेमा वगळता तीन सिनेमाने १०० कोटीचा आकडा पार केला आहे. पहिल्यादा ती अक्षय व सलमान यांना सोडून चॉकलेटी ब्वॉय शाहिद सोबत झळकणार आहे. त्यामुळे आगामी काळात या सिनेमला कसा प्रतिसाद लाभतो हे पाहण्यासाठी सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहवी लागणार आहे.