एका आठवडयातच ‘दबंग-२’ ची कमाई १०० कोटी

२१ डिसेंबरला रिलीज झालेला सलमान खानचा बहुचर्चित ‘दबंग-२’ या सिनेमाने १०० कोटी कमाई केली आहे. या दोन वर्षातील सलमान खानचा हा चौथा सिनेमा आहे ज्याची कमाई १०० कोटी पेक्षा अधिक झाली आहे. यापूर्वी त्याच्या ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’ आणि ‘एक था टाइगर’ या सिनेमाने १०० कोटीपेक्षा आधिक कमाई केली होती. येत्या काही दिवसात ‘दबंग-२’ हा सिनेमा त्याच्या ‘एक था टाइगर’ या सिनामचे रेकॉर्ड ब्रेक करतो का हे पाहणे आता ओतुस्क्याचे ठरणार आहे. अभिनेता सलमान खानने स्वताच्या हिमतीवर पुन्हा एकदा १०० कोटीची कमाई करता सर्वाना मागे टाकले आहे.

सलमानच्या या बहुचर्चित ‘दबंग-२’ या सिनेमाने आठवडाभरात १००.७८ कोटी रुपये कमविले आहेत. ‘दबंग-२’ हा सिनेमा सलमानच्या दोन वर्षापूर्वी आलेल्या ‘दबंग’ या सिनेमचा सिक्वल आहे. या सिक्वलने सुद्धा १०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. अरबाज खानच्या प्रोडक्शन बैनरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाची पटकथा दिलीप शुक्लाने लिहिली आहे. दिग्दर्शन अरबाज खानने केले आहे.

हा सिनेमा २१ डिसेंबरला ३५०० सिनेमाघरामध्ये रिलीज झाला होता. सलमानशिवाय या सिनेमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची महत्वपूर्ण भूमिका आहे. त्याशिवाय या सिनेमात करीना कपूरने फेविकॉल या गाण्यावर आयटम केले आहे. ते सुद्धा खूपच पॉप्युलर झाले आहे. त्यामुळे हा सिनेमा हिट झाला असल्याचे मानले जाते.