करीना म्हणते, आमिरच दिग्गज अभिनेता

काही दिवसापूर्वीच बॉलीवूडमधील स्टार अभिनेत्री करीना कपूर बिग सीबीएस प्राइमचा कार्यक्रम ‘इंडियाज प्राइम आयकन’ मध्ये सहभागी झाली होती. यावेळी बोलताना ती म्हणाली, ‘बॉलीवूडमधील इतर अभिनेत्याच्या तुलनेत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हाच एक दिग्गज अभिनेता आहे. त्याच्याकडे वेगवगळ्या स्वरूपाचे काम करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच माझ्या मते या काळातील एक तो गुणी अभिनेता आहे.’

करीना कपूरची मोठी बहिण करिश्मा कपूरने देखिल त्याकाळी आमिरच्या कामाची प्रशंसा केली होती. विशेष म्हणजे १५ वर्षापूर्वी तिने ‘राजा हिंदुस्तानी’ या सिनेमात त्याच्यासोबत काम केले होते. त्यामुळे करीनाला देखील अमीर खानचा अभिनय लहानपानापासून आवडतो. त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली त्त्यामुळे करीना स्वताला भाग्यवान समजते. सिनेसृष्टीतील आमिर हा एक दिग्गज आहे. सिनेमात काम करीत असतना तो नेहमीच नवीन विषयावर काम करीत असतो. करीनाला सुद्धा आतापर्यंत त्याच्यासोबत दोन सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.

करीना कपूरने काही दिवसापुर्वीच अभिनेता सैफ अली खान सोबत केले आहे. तरी पण तिने अमीर खानच्या अभिनयाचे तोंड भरून कौतुक केले आहे. करीनाने तीन वर्षापूर्वी ‘३ इडियट्स’ या सिनेमात अमीर सोबत काम केले होते. हा सिनामा हिट झाल्याने त्यावेळेसपासून करीना आमिर खानला बॉलीवुड मधील दिग्गज अभिनेता मानते.