सलमान-ऐश्वर्या दिसले एकत्र

ख्रिसमस निमित सन्नी आणि अनु दीवानने त्यांच्या घरी एक शानदार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलीवूड मधील बरीच मंडळी सहभागी झाली होती. यावेळी ऎश्वर्या रॉय,सलमान खानसह ब-याच बॉलीवुड स्टार्सने हजेरी लावली. मात्र या पार्टी दरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्याची उपस्थिती हाच चर्चेचा प्रमुख विषय होता.

या पार्टीमध्ये ऎश्वर्या ही पति अभिषेक सोबत आली होती. मात्र त्याच वेळी सलमानने पार्टीमध्ये एन्ट्री केली होती. त्यामुळे दोघेजण बोलणार की नाही. एकमेकासमोर तर येतील का या विषयवरच पार्टीत बराच काळ चर्चा रंगली होती. गेल्या आठ वर्षापासून सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील संबध बिघडले असल्याने दोघेपण एकमेकाना बोलत नाहीत. ‘हम दिल दे चुके’ या सिनेमानंतर दोघांचा एकत्रित सिनेमादेखिल आलेला नाही. त्यानंतर २००७ साली ऐश्वर्याने-अभिषेक सोबत लग्न केले.

या पार्टीमध्ये ऎश्वर्या रॉय, सलमान खान यांच्या शिवाय अभिषेक बच्चन, अमिषा पटेल, डिनो मोरियो, सुनिल शेट्टी, रणबीर कपूर, अक्षय कुमार, सोहेल खान, तुषार कपूर यांच्यासह बॉलीवुडमधील बरीच सेलिब्रेटीजने यावेळी हजेरी लावली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही पार्टी रंगली होती.

Leave a Comment