अभिषेक बच्चनला नवी नवीन गाडी चालविण्याचा मोठ शौक आहे. त्यामुळे तो गाडीसाठी काहीही करण्यास तयार असतो. बाइक चालविण्यासाठी तो नेहमीच उदय चोप्रा आणि जॉन अब्राहम कडून नवीन टिप्स सदैव घेत असतो. उदय चोप्रा आणि जॉन अब्राहम हे दोघेपण बाइकचे मोठे शौकीन आहेत. हे सगळ्या बॉलीवूडला माहित आहे.
गेल्या काही दिवसापासून अभिषेक पत्नी ऐश्वर्या रायला एक नवीन कार गिफ्ट देण्याचा विचार करीत आहे. तसे पाहिले तर साध्ये दोघाकडे पण एक लग्जरी कार आहे. तरी पण ऐशला एक नवीन कार गिफ्ट देण्याची इच्छा अभिषेकची आहे. काही दिवसापूर्वीच त्यांची कन्या आराध्याच्या वाढदिनी आजोबा बिग बी अमिताभ बच्चन यांनी तिला एक कार गिफ्ट दिली होती. ही कार गिफ्ट देऊन अजून एक महिनापण झाले नाही. तो पर्यंतच अभिषेक आता ऐश साठी गिफ्ट म्हणून दुसरी नवीन कार घेत आहे.
अभिषेकच्या मते, ‘आम्ही दोघांनी आत्तापर्यंत एकाच कारमधून खूप प्रवास केला आहे. त्या कारची ऐशला काहीच अडचण नाही. तरी पण मला तिला एक नवीन कार गिफ्ट करायाची इच्छा आहे.’ त्यांच्या पसंतीची कार खरेदी करण्यासाठी ते काही दिवसापूर्वीच जिनीवा येथील कार शो मध्ये सहभागी झाले होते. त्यठिकाणी त्यांना एक कार पसंत पडली असून ती कार दोघानी फायनल ही केली असल्याचे समजते.