बलात्कारयाना फाशीच द्या- अण्णा हजारे

पुणे दि.२४- दिल्लीतील गँगरेपप्रकरणातील जखमी तरूणीला पाठींबा दर्शविण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांना आपले समर्थन असून बलात्कारयाना फाशी दिली जावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तेवीस वर्षीय तरूणीला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी पुकारलेल्या लढ्यात आपण सहभागी होणार आहोत असे हजारे यांनी जाहीर केले आहे.

अण्णा म्हणाले की गुन्हेगारांना फाशीच दिली जावी. त्यामुळे पुन्हा असले गुन्हे करण्यास कोणीही धजावणार नाही. असल्या घटनांत जलद न्याय दिला जावा अशीही मागणी अण्णा यांनी केली आहे.

दुसरीकडे श्रीनगरमधील हुरियत नेते सईद अलीशाह गिलानी यांनी हे कृत्य लज्जास्पद आणि अमानुष असल्याचे मत व्यक्त करून गुन्हेगारांना दगडाने ठेचून मारावे असे म्हटले आहे. संबंधित तरूणीवर ओढवलेल्या प्रसंगाने आमच्या हृदयावरच घाला पडला आहे असे सांगून ते म्हणाले की हे दिल्लीत घडले तर दिल्लीतील लोक रस्त्यावर उतरले. मात्र गेली बावीस वर्षे काश्मीरमध्ये हजारो बलात्कार घडले आहेत त्याविरोधात मात्र कुणीच आवाज उठविलेला नाही याचे दुःख होते.

Leave a Comment