पाकविरुद्ध नाणेफेक निर्णायक – धोनी

गेल्या कित्येक वर्षाच्या विश्रातीनंतर पाकिस्तानविरुद्ध मंगळवारपासून टी -२० ची मालिका सुरू होत आहे. ही मालिका भारत व पाक या दोन्ही संघाच्या दृष्टिने महत्वाची मानली जात आहे. या मालिकेतील विजयासाठी नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरणार असून त्यावरच या सामन्याचा निकाल अवलंबून राहणार आहे, असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केले.

याबाबत अधिक बोलताना कर्णधार धोनी म्हणाला, ‘सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे सर्वत्र दव पडते. त्यामुळे डे-नाईट सामन्यात दव महत्वाचे ठरू शकतात. त्यामुळे सुरुवातीला नाणेफेकीचा कौल जिंकणे महत्वाचे आहे. भारतातील जवळपास सर्वच मैदानावर दवबिंदू पडतात. त्यामुळे या सामन्यात टॉस निर्णायक ठरनार असून यावरच जय-पराजय हे अवलंबून राहणार आहे.’

नुकतीच इग्लंडविरुद्ची टी -२० ची मालिका बरोबरीत सुटल्याने टीम इंडियावर कोणताही दबाव नाही. भारत व पाक या दोन्ही टीम जवळपास सारख्याच आहेत. फिरकीपटूंची संख्या देखील समान आहे. यामुळे दोन्ही सामने रोमांचक होतील. आगामी काळातील पाकविरुद्धची मालिका महत्वाची आहेच त्याशिवाय सर्वच मालिका माझ्या दृष्टीने महत्वाच्या असून मी सर्वच मालिकाना समान महत्व देतो. असेही यावेळी बोलताना धोनीने स्पष्ट केले.

Leave a Comment