पाकिस्तान विरुद्ध मालिकेसाठी संघ जाहीर

मुंबई:पाकिस्तानबरोबर दि. २५ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा रविवारी करण्यात आली.

इंग्लंडविरुद्ध खालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महेंद्रसिंग धोनी याला कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्याने त्याच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमार आणि शमी अहमद या दोन नव्या चेहेर्यांना या मालिकेत संधी देण्यात आली आहे. मागील विश्वचषक स्पर्धेनंतर प्रथमच युवराज सिंगचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

पाकविरुद्ध खेळणारा संघ असा- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, अशोक दिंडा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा

Leave a Comment