जागतिक तापमान वाढीचे परिणाम आता हळूहळू जाणवू लागले आहेत. सध्या सर्वत्र कोसळणारा पाऊस हे त्याचेच उदाहरण मानले जात आहे. दुसरीकडे या तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील सर्वच सरोवरांचे तापमान कमालीचे वाढले आहे. काही भागातल्या तळ्यांचे तापमान हे हवेपेक्षा जास्त वाढले असल्याचा खळबळजनक अहवाल नासाने सादर केला आहे.
पृथ्वीच नाही तर सरोवरेही तापताहेत
नासाच्या अखत्यारित काम करणारया जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत काम करणारे फिलीप स्नेडर आणि सायमन हुक यांनी उपग्रहाच्या मदतीने प्राप्त झालेल्या अहवालाचा बारकाईने अभ्यास करून नवी माहिती उघड केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जगातल्या १६७ सरोवरांचे तापमान ०. ८५ डिग्री फॅरेनाईटने वाढले आहे. १९८५ च्या तुलनेत हे तापमान खूपच वाढले आहे. देशातल्या सरोवरांचे तापमान १.८ डिग्री फॅरेनाईटपर्यंत वाढले आहे. सर्वांत जास्त वेगाने युरोपाच्या उत्तरेकडील सरोवरांचे तापमान वाढत आहे.
