वाहन चालवताना होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी लंडन येथील वॉल्हो कंपनीने संगणकीय प्रणालीवर आधारीत ‘नो डेथ कार’ची रचना केली असून ही कार संभाव्य अपघाताची माहिती संगणकीय प्रणालीद्वारे कारचालकाला देते, असा दावा या कंपनीने केला आहे. ही कार बाजारात यायला आणखी आठ वर्षं लागतील, असे व्हॉल्वो कंपनीच्या अधिकार्यांीनी स्पष्ट केले आहे. व्होल्वोच्या इतर कारप्रमाणे या कारमधील इतर यंत्रणा अद्ययावत, अत्याधुनिक असतील, असंही त्यांनी सांगितले आहे. व्होल्वोचा प्रयोग १०० टक्के यशस्वी झाल्याचे अपघाताचे दुष्टचक्र नक्कीच आटोक्यात येऊ शकेल.
अपघाताची पूर्वकल्पना देणारी ’नो डेथ कार’
चालकाला संभाव्य धडकेची कल्पना देण्यासाठी या कारमध्ये खास सेन्सर बसवण्यात येणार आहेत. ज्यायोगे चालक वेळीच सावध होऊन अपघात टाळण्यासाठी हालचाल करू शकेल. इतकंच नव्हे तर, या कारमध्ये ’ऑॅटो पायलट मोड’ ही असल्याने अगदीच गांगरलेला ड्रायव्हर, बिकट प्रसंगी या सुविधेचा आधार घेऊ शकतो. ’ऑॅटो मोड’ वर ही कार अपघातापासून स्वतःच स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करेलच, पण चालकही सुखरूप राहील याची काळजी घेईल. त्याशिवाय, ही कार क्रॅशप्रूफ असल्यानं, अगदी छोटी-मोठी धडक बसलीच, तरी आतल्या व्यक्तीना खरचटणारही नाही, असा दावा कंपनीने केला आहे.
