टीम इंडियाला मालिका विजयाची संधी

पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यातील विजयामुळे खुशीत असलेल्या टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध आज (शनिवार) होणारा दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी चलून आली आहे. कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर झालेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्याची संधी भारतीय संघ याठिकाणी विजय मिळवून साधेल असे वाटते.

मुंबई येथील वानखेडेवर शनिवारी भारत व इंग्लंड यांच्यात मालिकेतील दुसरा व शेवटचा टी-20 सामना होणार आहे. या स्पर्धेत युवराजसिंगला गवसलेला फलंदाजी आणि गोलंदाजीतील फॉर्म ही एक जमेची बाजू आहे. त्याशिवाय पुणे येथील सामन्यात गंभीर, रहाणे, कोहली, रैना आणि स्वत: धोनी अशी टीम इंडियाची बलाढ्य फलंदाजीची फळी इंग्लंडच्या नवोदितांच्या संघाला परभूत करून चलून आलेली संधी निश्चित सोडणार नाहीत असे वाटते.

ही खेळपट्टी कसोटी क्रिकेटप्रमाणे नसेल. या टी-२० सामन्यांसाठी पाटा खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. यावर पावणेदोनशेच्या जवळपास धावसंख्या उभारली जाऊ शकते. सीमारेषा कसोटीइतकीच म्हणजे ७१ यार्डांची ठेवण्यात आली आहे. रात्री पडणार्‍या दवाचा कुणाला फायदा-तोटा होतो यावरही सामन्याचा निकाल अवलंबून आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हे मैदान सत्वपरीक्षा पाहणारे आहे.

Leave a Comment