अपंगांना अ आ इ ….. शिकवणार रोबोट!

सर्वसामान्यांशी जुळवून घेऊ शकत नसल्याने शारीरिक व मानसिक अपंगत्व असलेल्या मुलांसाठी वेगळ्या शाळा असतात. त्यांच्या अडचणी समजून त्यांना शिकवणे म्हणजे मोठे अवघड काम असते. पण आता अशा शाळांमध्ये अपंग मुलांना शिकविण्यासाठी लवकरच शिक्षकाची जागा रोबोट घेणार असून, कास्मोबोट नावाचा हा रोबोट मानवाप्रमाणेच मुलांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करू शकेल.

अमेरिकेतील अॅथ्रोट्रानिक्स इंजिनियरिंग रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट फर्मने या कॉस्मो रोबोटची निर्मिती केली आहे. या रोबोटवर आणखी काही चाचण्या व्हायच्या बाकी आहेत. त्यात सफल झाल्यानंतर तो शिक्षकाची उणीव भरून काढण्यात सफल ठरेल, अशी आशा आहे.