सोनम कपूर व आयुष्मान खुराना यशराज फिल्म्सच्या आगमी काळात येत असलेल्या एका प्रोजेक्टमधून झळकणार आहेत. दोघेजण पण यशराज फिल्म्सच्या बैनरखाली पहिल्यांदाच काम करीत आहेत. त्यशिवाय पाहिल्यदाच यशराज कैम्पच्या सिनेमाचे दिग्दर्शन एक महिला करीत आहे. त्यामुळे आगमी काळात येत असलेल्या या सिनेमाबाबत सर्वाना उत्सुकता लागली आहे.
यशराजच्या सिनेमातून सोनम व आयुष्मान झळकणार
या सिनेमाचे डायरेक्टर म्हणून नुपूर अस्थाना ही काम पाहणार आहे. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार, ‘या सिनेमातून जीवनातील एक मजेशीर पैलू दाखविण्यात येणार आहे. या सिनेमाचे शूट लवकरच सुरु होणार असून. पुढील वर्षीच्या फेब्रूवारी महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमासाठी आवश्यक असलेली सर्वच तयारी पूर्ण झाली आहे. सोनम कपूर व आयुष्मान खुराना यांच्या शिवाय या सिनेमामधील अन्य कलाकारची निवड करण्यात आली असून लवकरच शूट सुरु होणार असल्याचे समजते.
या सिनेमाची कहानी दिल्ली शहरावर आधारित आहे. या सिनेमाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब म्हणजे आयुष्मान आणि सोनम दोघेपण देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहराचा लहानपणापासूनच हिस्सा बनले आहेत. त्या दोघांना पण दिल्ली शहरातील राहनीमानाची माहिती असल्याने या सिनेमात काम करताना दोघांनापण अडचण होणार नाही.
